Pune : हडपसर परिसरात मध्यरात्री आगीची घटना, गोडाऊनला भीषण आग

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात रात्री उशिरा एका गोडाऊनमध्ये आग लागली. हे पुठ्ठ्याचे गोडाऊन असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण करत पसरत गेली. यामध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

हडपसर गाव, राम मंदिर जवळ ही आगीची घटना घडली. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. गोडाऊनमध्ये पुठ्ठे असल्याने आग वेगाने पसरत होती. आगीचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये आगीची भीषणता जाणवत आहे. उंच ज्वाळा आणि धूराचे लोट परिसरात पसरले होते.

तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने नंतर कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू करण्यात आले. आग लागल्याने पुठ्ठ्याच्या गोडाऊनमधील सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

You might also like