पुणे \ पिंपरी : कोकणे चौकात सराफावर भरदिवसा गोळीबार 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकणे चौकात एका सराफावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. यामध्ये सराफ जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या असून त्यापैकी एक गोळी सराफाच्या पायाला लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे पुणे दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कोकणे चौकात आकाश गंगा सोसायटी आहे. या ठिकाणी असलेल्या सराफावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. सोनाराला लुटण्याच्या हेतूने हा गोळीबार केला असल्याचे बोलले जात आहे. कोकणे चौकात असलेल्या पुणेकर ज्वेलर्समध्ये घुसून गोळीबार करण्यात आलेला आहे. यामध्ये सराफाच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. चोरट्यांनी दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले आहेत का याची चौकशी सुरू आहे.

भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी सराफ दुकानात घुसून गोळीबार झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांचे पथके गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्य वेदांत रेसिडेन्सी, रहाटणी, पुणे) असे गोळीबारात जखमी झालेल्या ज्वेलर्सचे नाव आहे.

पुणे पिंपरी : कोकणे चौकात सराफावर भरदिवसा गोळीबार

पुणे पिंपरी : कोकणे चौकात सराफावर भरदिवसा गोळीबार

Geplaatst door Policenama op Woensdag 6 maart 2019

 

 

 

 

Loading...
You might also like