बगदादमध्ये आंदोलनकर्त्यांवर ‘बेछूट’ गोळीबार, 16 ठार तर 45 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बेछुड गोळीबार करण्यात आला आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी हा सर्व प्रकार केल्याचे समजते यामध्ये १६ जण ठार तर ४५ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर हे एका कारमधून आले होते त्यांनी बगदादच्या अल खलानी स्क्वेअरमध्ये खुसून आंदोलकांवर हल्ला केल्याची माहिती इराकच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली.

इराकमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अनेक आंदोलने सुरु आहेत त्यामुळेच येथील संसद देखील बरखास्त करण्यात आली होती. सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अल खलाणी हा परिसर ताब्यात घेतला होता. याच आंदोलनामुळे पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता.

देशातील हिंसक आंदोलनामुळे आतापर्यंत ४२० हुन अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शिया राजकीय संघटनांनी आणि मलेशियातील सदस्यांनी घुसखोरी करून हल्ला केला आहे असे आरोप आंदोलनकर्ते करताहेत.

Visit : Policenama.com