देशाचं पहिलं सोशल मिडीया App Elyments झालं लॉन्च, जाणून घ्या खासियत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनी अ‍ॅप्सवर बॅन लावल्यानंतर भारताला अ‍ॅप्स आणि सोशल मीडियाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या प्लॅनची सुरूवात झाली आहे. याकडे भारताने आणखी एक पाऊल टाकले आहे. सुमारे 1 हजारपेक्षा जास्त आयटी प्रोफेशनल्स स्वदेशी अ‍ॅप बनवण्यासाठी एकत्र आले आहेत. या अभियानांतर्गत श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने एक भारतीय सोशल मीडिया सुपर अ‍ॅप ‘एलीमेंट्स’ तयार केले आहे.

एक अ‍ॅपमध्ये अनेक गुण
हे अ‍ॅप बनवण्यासाठी मोठ्या संख्येन आयटी एक्सपर्टने काम केले आहे. या एकमेव अ‍ॅपमध्ये अनेक गुण असतील, यामुळे वेगवेगळी अ‍ॅप वापरण्याची गरज राहणार नाही. यामध्ये सोशल कनेक्टिव्हिटीसह, चॅटींग, ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग, ई-पेमेंट, ई-कॉमर्ससारखी फिचर्स आहे. हे अ‍ॅप 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रायव्हसी एक्सपर्टच्या मदतीने यूजर्सच्या डाटाच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.

यूजर्सचा डाटा सुरक्षित राहणाचा दावा
समुहाकडून दावा करण्यात आला आहे की, अनेक महिन्यांपासून या अ‍ॅपची टेस्ट करण्यात आली आहे. यासाठी समूहाने म्हटले आहे की, यूजर्सचा डाटा देशातच राहील आणि कोणतीही तिसरी पार्टी चोरू शकणार नाही. सध्या हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे आणि आतापर्यंत सुमारे एक लाखपेक्षा लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. रविवार, 5 जुलैला देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी पहिले स्वदेशी सोशल मीडिया अ‍ॅप एलीमेंट्स लाँच केले. लाँचिंगदरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर सुद्धा उपस्थित होते.

देशात 50 कोटीपेक्षा जास्त सोशल मीडिया यूजर्स
भारतात सोशल मीडिया वापरणार्‍यांची संख्या मोठी आहे. देशात सध्या सुमारे 50 कोटीपेक्षा जास्त सोशल मीडिया यूजर्स आहेत. यापैकी बहुतांश प्लॅटफार्म्समध्ये भारताच्या बाहेरच्या कंपन्या आहेत. सध्या परदेशी कंपन्यांच्या प्लेटफॉर्म्सवर डेटा प्रायव्हसीबाबत मोठी चर्चा सुरू आहे.

पीएम मोदी यांनी केले आवाहन
भारत-चीनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर भारतात 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी आणली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात टेक्नॉलॉजी कम्युनिटीच्या लोकांना मोठ्याप्रमाणात आत्मनिर्भर भारतीय अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले, आपल्या युवकांनी पुढे यावे आणि ट्विटर, फेसबुक आणि टिकटॉक सारखी भारतीय अ‍ॅप्स बनवावीत, मी सुद्धा त्यांना जॉइन करेन.