एकनाथ खडसे हे ‘राष्ट्रवादा’चा बुरखा घातलेल्या ‘राष्ट्रवादी’त गेल्यानं मी नि:शब्द, भाजप नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी अखेर पक्षाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील (jayant patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे यांनी सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली असून त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची बातमी पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, वो जाने वाले हो सके तो लौट के आना… असे त्यांनी म्हटले आहे. मनाविरुद्ध घडत असतानाही काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजनांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय. पण एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश ही धक्कादायक बातमी आहे. तसेच पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असे मला वाटतं. पक्षाला खडसेंसारखा नेता, ज्यांनी 40 वर्षे पक्षाची सेवा केली ते आज राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रवादीत जात आहेत, हे धक्कादायक आहे. मीही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. त्यामुळे, एकनाथ खडसेंना मी एवढंच म्हणू शकतो, ओ जाने वाले हो सके तो लौट के आना.. असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती आहे. एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला. पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला गेला, अशी टीका खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केली.