दक्षिण मुंबईच्या नागपाडा परिसरात भीषण आग, 70 वर्षांच्या आजोबांसह 5 जण गंभीर जखमी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दक्षिण मुंबईतल्या नागपाडा परिसरातील चिनॉय इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज(सोमवार दि 6 जानेवारी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आगीत काहीजण अडकले आहेत का याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती आहे. परंतु 5 जण या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परिसरात मात्र धुराचे लोटच्या लोट दिसत आहेत. जखमींमध्ये 70 वर्षांच्या आजोबांचाही समावेश आहे. अद्याप आग नियंत्रणात आलेली नाही. तब्बल 10 ते 15 अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी एक केमिकलचा टँकर असल्याचीही माहिती आहे. आग आटोक्यात आल्यानंतर आगीचं खरं कारण समोर येईलच.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/