पुणे जिल्ह्यात पूनर्वसन विभागाच्या बनावट आदेशाचा सुळसुळाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शासनाने पूनर्वसनासाठी जमीन दिल्याचे बनावट आदेश तयार करुन देणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय असून अशा बनावट आदेशाद्वारे त्याची सात बारावर नोंदणी करुन ती जमीन तातडीने दुसऱ्याला विकण्याचे गुन्हे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये घडत असल्याचे आढळून येत आहे. मुळशी तालुक्यातील नेरे गावातील अशीच ६९ आर जमीन पूनर्वसनासाठी दिल्याचे बनावट आदेश तयार करुन ती विकल्याचे पुढे आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’58ba319b-bbcc-11e8-86d8-cb5c37126014′]

या प्रकरणी समर्थ पोलिसांनी मंगल ऊर्फ मालन संभाजी काकडे (रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी) आणि रेणुकादेवी शांतारामबापू तुपे (रा. गाडीतळ, हडपसर) आणि आणखी एका जणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पूनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी उत्तम राजाराम पाटील यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३ आॅगस्ट २०१५ ते १ नोव्हेंबर २०१७ दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धरण, कालवे व अन्य विविध विकास कामांसाठी शासन शेतकऱ्यांकडून गरजेनूसार जमीन अधिग्रहित करते. यामध्ये विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन इतर ठिकाणी केले जाते. त्यासाठी शासन जमीन अधिग्रहित करुन ठेवते व बाधित झालेल्यांना त्याचे वाटप करते. हे काम पूनर्वसन विभागाकडून होत असते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये पूनर्वसनात जमीन मिळाली असल्याचे बनावट आदेश तयार करुन त्यावर खोट्या सह्या व बनावट चलन तयार करुन देणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. अनेक तालुक्यांमध्ये अशा बनावट कागदपत्राद्वारे शासनाच्या जमिनीचा आदेश तयार करुन त्याची सात बारा वर नोंद करुन घेतली जात आहे. अशी नोंद सात बारा वर झाली की त्या जमिनी तातडीने दुसऱ्यांना विकल्या जात आहे.

पुण्यात दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या कारचालकाला तीन महिन्यांची कैद

पूनर्वसन आणि सात बारा नोंदणी करणारे तहसील कार्यालये हे दोन्ही विभाग महसुल विभागात येत असताना त्यांच्यात परस्परात वर्षानुवर्षे ताळमेळ नसल्याने जिल्ह्यात करोडो रुपयांचे व्यवहार होऊन फसवणूकीच्या घटना घडत आहे. मुळशी तालुक्यातील मौजे नेरे येथील ६९ आर जमिनीचे असे पूनर्वसन विभागाच्या नावाने बनावट आदेश तयार करण्यात आले. त्यावर खोट्या सह्या व बनावट चलन तयार करण्यात आले. त्या आधारे या जमिनीच्या सात बारावर मालन काकडे व रेणुकादेवी तुपे यांच्या नावे ६९ आर जमिनीवर लावण्यात आली.

तळेगाव पोलिसांची एकाच दिवशी ७२ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

सात बारावर त्यांची नावे लावण्यात आल्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांनी ही जमीन इतरांना विकून टाकली. आता वर्षानंतर पूनर्वसन विभागाला आपल्याकडील शासकीय जमीन ही परस्पर विकली गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.