कऱ्हा नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे)  – पुरंदरच्या पश्चिम भागात सतत होत असलेल्या पावसाने कऱ्हा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पाण्याचा प्रवाह हा खुप मोठा आहे. ओढे, नदी-नाले यांना पूरस्थिती आली आहे. कऱ्हा नदीच्या काठी असलेल्या गावांना, वाड्या- वस्तींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीच्या उगमापासून ते नाझरे जलाशया पर्यंतचे तीन मोठे पूल सोडता सर्व लहान पूल, साकव पूल हे पाण्याखाली गेले आहेत. तरी नागरिकांनी वाहत्या पाण्यामध्ये या पुलाचा वापर करू नये. असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. पाण्यातून वाहने नेऊ नयेत, पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज न आल्यास अनुचित प्रकार घडू शकतो, याची काळजी नागरिकांनी घ्यावी.

नाझरे जलाशयातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे, नाझरे जलाशयाचे सर्व दरवाजे काही प्रमाणात उघडण्यात आले आहेत, त्यामुळे जलाशयाच्या काठी असलेल्या गावांना, वाड्यांना, वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन सर्व परिस्थिती वर लक्ष देऊन आहेच परंतु नागरिकांनी देखील योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. कऱ्हा नदीला आलेल्या पुरामुळे जेजुरी नजीकच्या सहा गावांचा जेजुरी पासुन संपर्क तुटला आहे.

Visit : policenama.com