Flour For Weight Loss | वजन कमी करण्यासाठी कोणत्या पिठाच्या रोट्या आहेत सर्वोत्तम?

पोलीसनामा ऑनलाइन टीम | रोटी किंवा चपाती हे भारतीय अन्नाचा महत्त्वाचा भाग आहे (Flour For Weight Loss). रोटीशिवाय भाजी, डाळ किंवा चटण्यांची चव अपूर्ण वाटते. जेव्हा आपण वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा रोटी, भात आणि ब्रेड यांसारखे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ (Carbohydrate Foods) कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता हेल्दी (Healthy Food) आणि वजन कमी करण्यासाठी अनेक धान्यांचे पिठ आपल्याला मदत करतात. या पिठापासून बनवलेल्या रोट्या वजन कमी करण्यात मदत करतात (Flour For Weight Loss).

जाणून घेऊया कोणत्या रोट्या तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करतील.

· बाजरीचे पीठ (Millet Flour)

बाजरी आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असते. बाजरीचे पीठ हे अत्यंत पौष्टिक आहे (Bajra Flour). बाजरीची भाकरी वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetic Patient) अत्यंत फायदेशीर आहे. कारण ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. बाजरी पचनास मदत देखील करते. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) देखील कमी करते. एवढेच नाही तर बाजरी काही प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही कमी करते.

· ओट्सचे पीठ (Oat Flour)

ओट्स पीठ हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे. ओट्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. जे आपले पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवते आणि भूक कमी करते. ओटचे पीठ वजन कमी करण्यास, रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित करण्यास, तसेच हृदयविकाराचा (Heart Disease) धोका कमी करण्यास मदत करते (Flour For Weight Loss).

· बेसनाचे पीठ (Gram Flour)

बेसन हे प्रथिने (Protein) आणि फायबरचा (Fiber) चांगला स्रोत आहे. गव्हाच्या पिठापेक्षा बेसनामध्ये कमी
कॅलरीज असतात. बेसन वजन कमी करण्यास मदत करते (Gram Flour Helps To Weight Loss).
तसेच पचन सुधारते आणि अॅनिमियावर (Anemia) चांगला उपचार करते.

· ज्वारीचे पीठ (Sorghum Flour)

ज्वारीचे पीठ ग्लूटेन मुक्त (Gluten) असते. त्यामुळे सेलिक रोग (Celiac Disease) किंवा गव्हाची ऍलर्जी
(Allergy Of Wheat) असलेल्या लोकांसाठी ज्वारीचे पीठ एक चांगला पर्याय बनते. ज्वारीचे पीठ हे प्रथिने, फायबर,
कॅल्शियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. ज्वारीचे पीठ वजन कमी करण्यास मदत करते.
त्याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level) करण्यास आणि हृदयविकाराचा धोका
कमी करण्यास देखील मदत करते (Help To Cure Heart Disease).

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Anti-Encroachment Drive | आंबेगाव येथील अनधिकृत 11 इमारतींवर महापालिकेचा हातोडा, 500 सदनिका उध्वस्त

Pune Police MPDA Action | हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 76 वी स्थानबध्दतेची कारवाई

Bharat Todkari Passed Away | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार भारत तोडकरी यांचे निधन

वकिलांच्या फ्लॅटमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; दोघीही म्हणतात मी त्यांची सहायक

Pune Pimpri Accident News | ताम्हिणी घाटात बसला भीषण अपघात, २ महिलांचा मृत्यु, ५५ जखमी