Coronavirus : ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘रोगप्रतिकार शक्ती ‘ वाढविण्यासाठी ‘या’ 2 पदार्थांचे नक्की सेवन करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रकोप चारही बाजूला पसरत आहे. यापासून वाचण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सतत ताप, सर्दी, खोकला, होत असेल तर समजून घ्या की, तुमची इम्युनिटी पॉवर कमजोर आहे. कोणत्याही व्यक्तीचे आजारी पडणे हे त्याच्या आजाराला तोंड देणार्‍या शारीरातील ताकदीवर अवलंबून असते, त्यास रोग प्रतिकारकशक्ती (इम्यून सिस्टम) म्हणतात.

शरीरातील ही प्रणाली मजबूत असेल, तर आजाराचे विषाणू तुम्हाला काहीही करू शकणार नाहीत. पण जर ही प्रणाली कमजोर झाली तर व्हायरसचा शरीरावर लवकर परिणाम होतो. तुम्ही काही पदार्थांचे सेवन करून आपली इम्युनिटी मजबूत करू शकता. कोरोनाच्या सुरूवातीच्या लक्षणात सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे आढळतात. यापासून वाचण्यासाठी इम्युनिटी वाढवणार्‍या पदार्थांचे सेवन करणे जरूरी आहे.

1. लसूण
लसूण खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या आपोआप दूर होतात. यामध्ये अँटीबॅक्टीरियल गुण असल्याने व्हायरसशी लढण्यास मदत होते. लसूण शरीराची इम्यून सिस्टम मजबूत करतो. कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनपासून लसूण वाचवतो. रोज एक लसणाची पाकळी कच्ची चावून खावी.

2. ज्येष्टीमध
ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. हिच्या मुळात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, यामुळे इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते. याच्या सेवनाने अनेक प्रकारच्या आजारापासून सुटका होते.