‘हे’ आहेत जगात सर्वाधिक विकले जाणारे 25 Whisky ब्रँड्स, त्यापैकी 13 भारतीय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगातील सर्वाधिक विक्री होणारी व्हिस्की भारतीय ब्रँड आहे. फोर्ब्सच्या यादीतील या 25 व्हिस्की ब्रँडपैकी 13 ब्रँड भारतीय आहेत. इतकेच नाही तर सर्वाधिक विक्री होणारी व्हिस्की देखील भारतीय कंपन्या बनवतात. पहिल्या क्रमांकावर जो ब्रॅंड आहे त्याचे नाव मॅकडॉवेल्स आहे. या यादीमध्ये असे म्हटले आहे की जर सेल 1000 लिहिले तर याचा अर्थ कंपनीने 10 लाख पेट्या विकल्या आहेत. मॅकडॉवेल्सने वर्ष 2019 मध्ये 30,700 पेट्या म्हणजेच 3070 कोटी पेट्यांची विक्री केली. हे युनायटेड ब्रूअरीज बनवते.

दुसरा क्रमांक ऑफसर्स चॉईसचा आहे. त्यात 30,600 पेट्या विकल्या गेल्या. हे अलाइड ब्लेडर्स अँड डिस्टिलरीज बनवते. तिसर्‍या क्रमांकावर इम्पीरियल ब्लू आहे. यास परनॉड रिकार्ड ही कंपनी बनवते. त्याच्या 26,300 पेट्या विकल्या गेल्या. चौथ्या क्रमांकावर रॉयल स्टॅग आहे. यास देखील परनॉड रिकार्ड बनवते. यांनी 22 हजार पेट्या विकल्या. पाचव्या क्रमांकावर स्कॉटिश कंपनी डियेजियोची जॉनी वॉकर आहे. याच्या 18,400 पेट्या विकल्या गेल्या.

सहाव्या क्रमांकावर अमेरिकेची जॅक डॅनियल्स आहे. यास ब्राउन फोरमॅन कंपनीने बनवले आहे. त्याची 13,400 पेट्या विकल्या गेल्या आहेत. सातव्या क्रमांकावर जॉन डिस्टलरीज या भारतीय कंपनीची ओरिजिनल चॉइस आहे. त्याच्या 12,700 पेट्या विकल्या गेल्या. आठव्या क्रमांकावर बीम सनटोरी या अमेरिकन कंपनीची जिम बीम आहे. याच्या 10,400 पेट्या विकल्या गेल्या. नवव्या क्रमांकावर युनायटेड स्पिरिट्सची हेवर्ड्स फाईन आहे. त्याची 9,600 पेट्या विकल्या गेल्या.

https://twitter.com/edanderson101/status/1279772796172865536

दहाव्या क्रमांकावर भारतीय कंपनी रेडिको खेतानची 8 पीएम आहे. त्याच्या 8,500 पेट्या विकल्या गेल्या. 11 व्या क्रमांकावर आयर्लंडची परनॉड रिकार्डची जेम्सन आहे. त्याच्या 8,100 पेट्या विकल्या गेल्या. 12 व्या क्रमांकावर कॅनडाची क्राउन रॉयल आहे. यास डियेजियो कंपनीने बनवले आहे. त्याच्या 7,900 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 13 व्या क्रमांकावर स्कॉटलंडची बॅलेन्टाईन आहे. यास परनॉड रिकार्ड बनवते. त्याच्या 7,700 पेट्या विकल्या गेल्या आहेत.

14 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड ब्लेंडर्स प्राइड आहे. यास देखील परनॉड रिकार्ड बनवते. त्याच्या 7,700 पेट्या विकल्या गेल्या. 15 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड बॅगपाइपर आहे. यास युनायटेड स्पिरिट्स बनवते. त्याच्या 6,100 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 16 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड रॉयल चॅलेंज आहे. यास युनायटेड स्पिरिट्स बनवते. त्याच्या 5,500 पेट्या विकल्या गेल्या. 17 व्या क्रमांकावर ओल्ड टॅव्हर्न आहे. यास देखील युनायटेड स्पिरिट्सने उत्पादित केले आहे. त्याच्या 5,300 पेट्या विकल्या गेल्या आहेत.

जपानचा सनटोरी काकूबिन 18 व्या क्रमांकावर आहे. यास बीम सनटोरी उत्पादित करते. त्याच्या 5,200 पेट्या विकल्या गेल्या. 19 व्या क्रमांकावर स्कॉटलंडची शिवास रीगल आहे. यास परनॉड रिकार्ड बनवते. त्याच्या 4,400 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 20 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड बंगळुरू मॉल्ट व्हिस्की आहे. यास जॉन डिस्टलरीज बनवते. त्याच्या 4,200 पेट्या विकल्या गेल्या. स्कॉटलंडचा ब्रँड ग्रांट्स 21 व्या क्रमांकावर आहे. यास विल्यम ग्रांट अँड सन्स यांनी बनवले आहे. तसेच याच्या देखील 4,200 पेट्यांची विक्री झाली आहे.

22 व्या क्रमांकावर भारतीय ब्रँड डायरेक्टर्स स्पेशल आहे. यास युनायटेड स्पिरिट्स बनवते. त्याच्या 4,200 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 23 व्या स्थानावर जपानची ब्लॅक निक्का आहे. यास असाही ब्रेवरीज ही कंपनी बनवते. याच्या 3,400 पेट्यांची विक्री झाली आहे. 24 व्या क्रमांकावर स्कॉटलंडची विल्यम लॉसंस आहे. यास बकार्डी बनवते. त्याच्या 3,300 पेट्या विकल्या गेल्या आहेत. 25 व्या क्रमांकावर स्कॉटलंडचीच डेवार्स आहे. यास देखील बकार्डी बनवते. त्याच्या 3000 पेट्या विकल्या गेल्या आहेत.