माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन

पोलिसनामा ऑनलाईन – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे काल रात्री निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 75 वर्षांच्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

मनोहर जोशी यांचा अनघा यांच्याबरोबर 14 मे 1964 रोजी विवाह झाला होता. त्यानंतर मनोहर जोशी सातत्याने राजकारण असल्यामुळे सर्व संसाराची जबाबदारी अनघा यांच्यावर होती. मुलांचे शिक्षण, संगोपन, संसार, कुटूंबियांची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली. मनोहर जोशी यांच्या अनेक कटूवेळी त्यांना अनघा यांनी जोमाने साथ दिल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.