‘Miss India Bikini’ राहिलेली मराठी अभिनेत्री निकिता गोखलेनं शेअर केलेल्या ‘न्यूड’ फोटोचा सोशलवर ‘कहर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठी अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल निकिती गोखले सोशल मीडियावर हॉटेनससाठी फेमस आहे. आपल्या बोल्डनेसमुळं निकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निकितीनं शेअर केलेल्या फोटोमुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कारण तिनं शेअर केलेला फोटोही तसाच आहे. याधीही तिनं अनेक असे फोटो शेअर करून सोशलवर खळबळ उडवून दिली आहे. यावेळीही तसंच काहीसं झालं आहे.

निकिता गोखलेनं इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती पूर्णपणे न्यूड झालेली दिसत आहे. चाहते तिचा हा न्यूड फोटो पाहून पाणी पाणी झाले आहेत. अनेकांना फोटो पाहून घाम फुटला आहे.

फोटोत दिसत आहे निकितीनं रेड लिपस्टिक लावली आहे आणि लाईट मेकअप केला आहे. निकिताचा हा फोटो वाऱ्यासारखा सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. निकितानं दिलेली पोजही खूप कामुक आहे. चाहत्यांनी तर या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

https://www.instagram.com/p/B6OMRblpGNe/

तुमसरमध्येच निकितानं आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. 17 व्या वर्षीच ती तुमसर गाव सोडून नागपूरला आली तिथे तिनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पुढे तिनं आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं आणि हळूहळू मॉडेलिंगमध्ये यशस्वी झाली.

निकितानं मॉडेलिंगमध्ये आपला खूप वेळ घालवला आहे. तिनं अनेक ब्युटी पेजेंट जिंकले आहेत. मिस वर्ल्ड बिकीनी इंटरनॅशनल 2015 या स्पर्धेमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केल्यानंतर निकिताला खूप लोकप्रियता मिळाली. तिनं मिस वर्ल्ड बिकीनी इंटरनॅशनल 2015 हा किताब मिळवला आहे. खूप कमी काळात निकीतानं मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे.

निकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचं झालं तर तिनं कॉलेज या मराठी सिनेमात काम केलं आहे. 2015 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, तिला 2018 मध्ये सलमान खानचा बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो ऑफर झाला होता.