माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांना अटक

सासवड न्यायालयाचे अजामीनपात्र अटक वॉरंट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सासवड येथील न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार बन्सीलाल नाहाटा यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कामकाजासाठी सासवड येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

नाहाटा याच्याविरुद्ध धनादेश न वटल्याप्रकरणी सासवड न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी नाहाटा हे वारंवार गैरहजर राहिले. त्यांच्याविरुद्ध सासवड येथील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. सदर वॉरंट श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी रात्री नाहाटा यांना अटक केली आहे.

नाहाटा हे श्रीगोंदा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे व्यक्ती मानले जातात. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अटकेची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

Loading...
You might also like