माजी पोलीस अधीक्षक एम. चेनीगुंड यांचे निधन

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी कामासाठी अकोला येथे आलेले एसआरपीएफचे माजी पोलीस अधीक्षक एम.चेनीगुंड यांचे रात्री झोपत निधन झाले. चेनीगुंड हे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील केर येथील रहीवासी. अत्यंत गरीबीतून शिक्षण घेवून त्यानी सुरवातीला पोलीस दलात शिपाई आणि त्यानंतर पोलीस उपअधीक्षक, अधीक्षक या पदापर्यंत पोहचले.

काही वर्षापुर्वी दौंड येथून एसआरपीएफचे कमांडट म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे दोन मुले, पत्नी, भाऊ, बहीण असा परीवार आहे.

चेनीगुंड हे नाशिक पोलीस उपअधीक्षक अकादमी, अमरावती, एसआरपीएफ सोलापूर कमांडट आदी ठिकाणी अत्यंत चांगली कामगिरी केली. चेनीगुंड हे पोलीस दलात असताना सुध्दा आंबेडकर चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.