‘मला HIV झालाय’ ! ‘या’ दिग्गज खेळाडूनं नाईलाजास्तव केलं जाहीर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेल्सच्या रग्बी संघाचा कर्णधार गेरेथ थॉमस सध्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. त्याने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या आजाराविषयी सर्वांना माहिती दिली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. आपल्याला एचआयव्ही असल्याचे त्याने सोशल मीडियावरून घोषित केले आहे. त्याचबरोबर या आजाराविषयी लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजाबद्दल देखील त्याने यावर भाष्य केले. 45 वर्षीय थॉमस याने याविषयी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

थॉमस याने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे कि, मला सतत धमक्यांचे फोन येत असल्याने मी अखेर हि माहिती सर्वांना शेअर केली. त्यामुळे माझ्या आजाराबद्दल तुम्हाला माझ्याकडूनच हि माहिती मिळायला हवी. त्यामुळे त्यांनी याविषयी काही सांगण्यापूर्वी मीच सांगून टाकावं, असे म्हणत त्याने हि माहिती शेअर केली आहे. काही वर्षांपूर्वीच मला एचआयव्ही झाल्याचे कळाले होते. मात्र हि गोष्ट सांगितल्यानंतर आता स्वतःला असुरक्षित समजत आहे, मात्र मी कमकुवत नाही. त्यामुळे मी या आजारासंदर्भातील गैरसमज दूर करण्याचा निर्णय घेतला. आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल केला. थॉमस याने वेल्सकडून 1995 ते 2007 दरम्यान 100 सामने खेळले आहेत. निवृत्त झाल्यानंतर त्याने 2009 साली आपण समलैंगिक असल्याचे देखील जाहीर केले होते. त्याचबरोबर त्याने याविषयी देखील अनेक दिवस लढा दिला होता.

दरम्यान, त्याने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याला अनेकांनी आधार दिला आहे. तसेच अनेक जणांनी त्याला खंभीर तसेच धीट राहण्याचा सल्ला दिला आहे.