प्रवेश परिक्षेची बनावट गुणपत्रिका देऊन MBA ला अ‍ॅडमिशन घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MBA प्रवेशासाठी ऐ टी एम ए या प्रवेश परिक्षेचे बनावट गुणपत्रिका देऊन एम. बी. ए. मध्ये प्रवेश घेतलेल्या चार विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये झारखंडमधील तीन विद्यार्थीनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

अपराजीता राज (रा़ बिस्तुपूर कालीमाली, जमशेटपूर), भोमिरा (मुफसिल बिहार, जि़ गया), दिव्या सिंग (ग्लोमोरी सिगबम), शैलेश कुमार सिंग (रा़ जमशेटपूर) अशी या चौघांची नावे आहेत.
याप्रकरणी डॉ. सुरभी प्रविण जैन यांनी पुणे विद्यापीठाच्या वतीने फिर्याद दिली आहे.

याबाबत डॉ. जैन या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक आणि हेड ऑफ डिपार्टमेंट मॅनेजमेंट सायन्सेस या विभागाच्या प्रमुख म्हणून काम पहातात. ऐ टीएम ए (एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स) या परिक्षेद्वारे एम. बी. ए. साठी प्रवेश दिला जातो. २०१८ -१९ या शैक्षणिक वर्षासाठी एआयएमएस टेस्ट फॉर मॅनेजमेंट या संस्थेच्या बनावट गुणपत्रिका सादर करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सादर करुन एम. बी. ए. साठी प्रवेश घेतला आणि विद्यापीठाची फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like