IRCTC चा अलर्ट ! रेल्वेचं तिकीट बुक करताना ‘ही’ चूक कराल तर बसेल लाखोंचा फटका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल आणि जर तुम्ही ऑलनाईन (www.irctc.co.in/nget/train-search) तिकीट बुक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. IRCTCनं आपल्या ग्राहकांना फ्रॉड करणाऱ्या लोकांपांसून सावधान केलं आहे. आयआरसीटीसीनं जारी केलेल्या स्टेटमध्ये म्हटलं आहे की, फसवणूक करणारे अनेकजण आयआरसीटीसी सारखी वेबासाईट बनवून फ्रॉड करताना दिसत आहेत.

काय आहे प्रकरण ?
IRCTCचं म्हणणं आहे की, irctctour.com ही वेबसाईट पूर्णपणे बनावट आहे. या वेबसाईटच्या नावावर अनेकांची फसवणूक सुरू आहे. हे लोक बनावट व्हाऊचर बनवून लोकांना लुटत आहेत. वेबसाईटवर देण्यात आलेल मोबाईल नंबर 9999999999 आणि लँडलाईन नंबर 916371526046 आणि ईमेल आयडी [email protected] हे सर्व काही बनावट आहे.

‘त्या वेबासईटसोबत संबंध नाही’
IRCTCनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, ही वेबसाईट irctctourism.com सोबत आमचा काहीही संबंध नाही. तिथे कोणताही व्यवहार केल्यास IRCTC जबाबदार असणार नाही.

तिकीटांच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश
रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनं गेल्या आठवड्यात रेल्वे तिकीटांच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला आणि झारखंडमध्ये राहणाऱ्या गुलाम मुस्तफाला ओडिसातून अटक केली आहे. त्यच्यासोबत इतर 27 जणांनाही ताब्यात घेतलं आहे. हे लोक तिकीटांचा काळाबाजार करून प्रत्येक महिन्याला कोटींची कमाई करत. हा पैसा टेरर फंडिंगसाठी वापरला जायचा. अद्याप झालेल्या तपासातून आरपीएफचा अंदाज आहे की, प्रतिमहिना जवळपास 10-15 कोटी रुपयांची कमाई वेगवेगळ्या प्रकारे देशातून बाहेर पाठवली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –