‘वंचित’ व रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पोलीस स्टेशन समोर मोफत दारू विक्री आंदोलन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कळंब तालुक्यातील मौजे मोहा भिमनगर, ता. कळंब येथील भागात बेकायदेशीर रित्या सुरू असलेली दारू विक्री बंद करने बाबत 17 सप्टेंबर 2019 रोजी कळंब पोलीस स्टेशन समोर मोफत दारू विक्री करण्यात येईल असे निवेदन दि 24. 08. 2019 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक पालवे साहेब यांना निवेदन देण्यात आले होते. तरीही अद्याप पर्यंत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यात आली नव्हती. म्हणून आज हे आंदोलन करण्यात आले.

आज कळंब पोलीस निरीक्षक दराडे यांनी दोन दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यात आली व अवैधरीत्या चालू असलेली दुकाने बंद करून ती कधीही चालू होणार नाही असे अश्वासन देण्यात आले. म्हणून आजचे आंदोलन थांबवण्यात आले आहे.

मोहा भिमनगर, कळंब येथील भागात बेकायदेशीर रित्या सुरू असलेली दारू विक्री बंद करने बाबत 15 वेळेस जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्क अधिकारी उस्मानाबाद, उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब, पोलीस निरीक्षक कळंब यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. परंतु कोणीही कसलाही प्रकारे दखल घेतली नाही. कारण भिमनगर मोहा येथिल महिला तरुण यांना याचा त्रास होत होता. महिला यांच्या समोर लघु शंका करणे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून वातावरण घराब करण्याचे काम दारु पिऊन लोक करित आहेत. त्यांच्या त्रासदायक वागण्यामुळे येथिल अवैधरीत्या चालू असलेले दुकान बंद करून दारु विक्री करणाऱ्या लोकांवर तडीपारीची कार्यवाही करुन कायमस्वरूपी या दारु विक्रीला आळा घालण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी अनिल हजारे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना उस्मानाबाद, लाखन गायकवाड, अरुण गरड, रसुल खान पठाण, सुरज वाघमारे, बाबा कसबे, प्रविण कसबे, मनोज भुंबे, विशाल वाघमारे, हिरवे शालन, ईंदुबाई कसबे, रुक्मिणी कसबे,आशाबाई कसबे, मंदाबाई कसबे, आशा माने, विमलबाई कसबे, आशा गाडे, अरुणा कसबे, आशाबाई शिंदे, सुशिला कसबे, सनी हजारे, आदमाने आवटे ,सुहास वाघमारे, भैय्यासाहेब अंबीरकर, साई गायकवाड, प्रदिप वाघमारे. उपस्थित होते.