‘फुलराणी’ सायना नेहवालनं मोठ्या बहिणीसह केला भाजपमध्ये प्रवेश, दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सकाळपासून भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू होती आजच सायनाचा भाजप प्रवेश पार पडू शकतो असंही बोललं जात असताना अखेर सायनानं भाजप प्रवेश केला आहे. सायनासोबतच तिची बहिण अबू चंद्रांशू नेहवाल हिनंही भाजपध्ये प्रवेश केला आहे.

दिल्ली विभानसभेत सायना नेहवाल भाजपाचा प्रचार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत आजच (बुधवार दि 29 जानेवारी) सायनाचा आज भाजप प्रवेश पार पडेल असं बोललं जात होतं. अशात तिनं भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या भावना मांडताना सायना म्हणाली, “मी एका हार्डवर्किंग परसन आहे. मला अशीच हार्ड वर्किंग माणसं खूप आवडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशासाठी खूप मेहनत घेत असतात. नरेंद्र मोदींनी स्पोर्टसाठी खूप काही केलं आहे. मला छान वाटत आहे की, मी असा पक्ष जॉईन केला आहे. मला मोदींपासून खूप प्रेरणा मिळते. मलाही आनंद आहे की, मला पक्षानं एवढा आदर दिला आहे.

सायना नेहवालच्याआधी रेसलर योगेश्वर दत्त आणि बबीता फोगाट यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यानंतर आता सायना भाजपच्या वाटेवर असल्याचं समजत होतं. आजच सायनाच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा