चक्क पोलीस ठाण्यातच रंगला पत्त्याचा खेळ

केज : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) – पोलिस ठाण्यात पोलिसच पत्त्याचा खेळ खेळतानाचा व्हिडीओ पोलीसनामाच्या हाती लागला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना चक्क पोलीस पत्त्याचा खेळ खेळतानाचा व्हिडीओ पोलीसनामाच्या हाती लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस जुगार अड्यावर कारवाही करण्याचं काम करतात मात्र पोलीस स्टेशनला या बहाद्दर पोलिसांनी जुगार अड्डा बनवल्याचे पहायला मिळाले आहे. राजरोज पणे या ठिकाणी असा प्रकार घडत असल्याचं येथिल ग्रामस्थ बोलत आहेत. आरोपी पकडण्यासाठी गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस बळ कमी असल्याचं कारण दाखवलं जात मात्र जुगार खेळायला वेळ कसा आला असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे.

पत्त्याचा जुगार खेळणे कायद्याने गुन्हा असतो, जुगार खेळताना पोलिसांकडून पकडले जाते आणि विशिष्ट कलमा खाली गुन्हा नोंद करून कार्यवाही करण्यात येते. परंतु पोलिसच पोलिस ठाण्यात पत्त्ये खेळत असतील तर याला काय म्हणायचे. असाच प्रकार बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात घडला असून वरिष्ठ काय भूमिका घेतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.