अबब ! एवढ्या चारचाकी, इतके मोबाईल आणि 13 लाखाचा ऐवज जप्त, पुण्यातील जुगार अड्ड्यावर छापा

पुणे/ भोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलिसांनी भोर येथील जुगार आड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एकूण 13 लाख 15 हजार 560 मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई महाड रोड लगत असलेल्या जय भवानी हॉटेलच्या बाजूच्या शेडमध्ये करण्यात आली. जुगार अड्डा चालवणाऱ्यास अटक करून 23 जणाविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाड रोड लगत असलेल्या जय भवानी हॉटेलच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये हारजितचा जुगार सुरु असल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना समजली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टकला. या करावाईत पोलिसांनी 1 लाख 14 हजार 260 रुपयाची रोख रक्कम, मोबाईल, 3 चारचाकी गाड्या, 7 दुचाकी, फॅन, खुर्च्या, टेबल असा एकूण 13 लाख 15 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा जुगार अड्डा चालवणारा रामदास किसन काराळे (रा भेलकेवाडी, ता. भोर) याला पोलिसांनी अटक केली असून 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल जावळे, शर्मा पवार, नाथसाहेब जगताप, योगेश कुलकर्णी तसेच भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे, पोलीस हवालदार सुभाष गिरे, उद्धव गायकवाड, अनिल हिप्परकर, महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/