पुणे महानगर आणि पुणे जिल्ह्याच्या प्रभारी पदी नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर आणि पुणे जिल्ह्याच्या प्रभारी पदी नगरसेवक गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .बिडकर यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, शहर सुधारणा समिती अध्यक्ष तसेच गटनेता म्हणून काम पाहिले आहे. भाजप शहर कार्यकरणीतही त्यांनी विविध पदे भूषवली आहेत.

मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांचा बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदार संघामध्ये शह देण्यासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गणेश बिडकर यांनी बारामतीत मुक्काम ठोकला होता. परंतु यश आले नाही. मात्र तत्पूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत विरोधी पक्षांना खिंडार पाडण्यात बिडकर यांनी महत्वाची भुमिका पार पाडली होती. ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. मागील काही महिन्यांपूर्वी भाजप शहर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या बिडकर यांचे नाव अंतर्गत स्पर्धेतून मागे पडले होते. परंतु पक्षाने त्यांना प्रभारी पदी संधी देत अपर हॅन्ड दिल्याचे बोलले जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like