स्पिरीटचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड, 75 लाखांचा माल जप्त, उत्पादन शुल्कची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्पिरिटचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून या टोळीला अटक केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने या वर्षात केलेली सगळ्यात मोठी कारवाई आहे. अटक करण्यात आलेले आरोपी स्पिरीटचा वापर करुन अवैधरित्या देशी दारू तयार करत होते. त्यांच्याकडून चार वाहनासह 75 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टेम्पोतील हनुमंत जोगदंड, कृष्णा जोगदंड आणि वसुदेव जोगदंड (रा. बीड) या तीन संशयितांकडे चौकशी केली. चौकशीत त्यांनी हे स्पिरीट औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-आंबेवाडी रस्ता येथील एका टँकरमधून आणल्याची माहिती दिली. त्यावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक संतोष झगडे यांच्या सुचनेनुसार भरारी पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील संबंधित टँकर चालकासह मालकाची चौकशी केली.

चौकशीदरम्यान त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील सागर बारंगुले याला स्पिरीट दिल्याचे समजले. त्यानुसार पथकाने मळेगाव येथे छापा टाकून स्पिरीटने भरलेले ड्रम व बनावट देशी दारूच्या बॉटल्स सिलबंद करण्याची मशीन, बुचे व इतर साहित्य जप्त केले. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्र.1 ने केलेल्या या कारवाईत सहाजणांना अटक केली आहे. आरोपींनी शिरुर येथील न्यायालयात हजर केले असता, आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, निरीक्षक अर्जुन पवार, कुटेकर, फटांगडे, उपनिरीक्षक दाबेराव, सुतार, सुपे, थोरात, माकर, बिरादार, वाघमारे, वाकडे, बोधे, तातळे, कदम, दरेकर, नाईक, शिंदे, धुर्वे, चव्हाण, कांबळे, पडवळ, सावंत, एडके, शिशोलेकर, लुगसे, कचरे, शेळके, व्हनगुंटी, ढब्बे, वाहन चालक कांबळे माने यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/