Gang Rape | हुंडा न मिळाल्याने लग्नाच्या दोन दिवसानंतर नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगालाही दिले चटके

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – हुंडा न मिळाल्याने दोन दिवसापूर्वी लग्न (Marriage) झालेल्या नवविवाहितेवर सासरच्याच घरात सहा ते सात जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कदायक घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायूं जिल्ह्यात घडली आहे. एवढेच नाही तर नराधमांनी पीडितेच्या गुप्तांगात काठ्या घातल्या, गरम चिमट्याने चटके दिले. याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पतीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. सामुहिक बलात्काराच्या (Gang Rape) घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी की, जरीफनगरमधील उस्मानपूर येथील रहिवासी असलेल्या युवकाबरोबर पीडितेचे २२ जूनला लग्न झाले होते. सासरी पीडिता पोहोचली त्यावेळी सासरच्या लोकांनी हुंडा न मिळाल्याने नवविवाहित मुलीवर अत्याचार करण्याचा कट आखला. दोन दीर व तिचा पती यांच्यासह सहा सात जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच नवऱ्याच्या दोन बहिणी आणि जाऊ यांचाही यात सहभाग होता.

एवढ्यावरच हे थांबले नाही तर नविवाहितेच्या गुप्तांगात काठ्या घातल्या, गरम चिमट्याने चटके दिले. कोल्ड्रिंकमधून विष देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही पीडितेने सांगितले. पीडितेच्या वडिलांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेहले. याप्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी निर्दयीपणे छळ केल्याचा आरोप नवविवाहितेने केला आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे. तपास सुरु असून योग्य कारवाई केली जाईल असे बदायूंचे एसएसपी संकल्प शर्मा (SSP Sankalp Sharma) यांनी सांगितले.

Web Title :- gang rape newlyweds two days after marriage burn private parts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू