फक्त 121 रूपये जमा करून मुलीच्या विवाहासाठी पैशांचं ‘नियोजन’ करा, LIC च्या ‘या’ पॉलिसीमधून मिळतील 27 लाख रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई वडील आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार नेहमीच करत असतात त्यामुळे मुलीच्या जन्मानंतरच लगेच मुलीच्या नावे पैसे साठवण्यासाठी सुरुवात केली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशा पॉलिसीबाबत सांगणार आहोत जी खास मुलींच्या विवाह लक्षात घेऊन सुरु करण्यात आलेली आहे. हा पॉलिसीचे नाव आहे कन्यादान योजना. 121 रुपये रोज या हिशोबाने 3600 रुपये महिन्याला भरून हा प्लॅन सुरु केला जाऊ शकतो. तसेच यापेक्षा कमी किंवा अधिक रुपयांमध्ये देखील हा प्लॅन सुरु केला जाऊ शकतो.

या खास पॉलिसीमध्ये जर तुम्ही दररोज 121 रुपये जमा केले तर तुम्हाला 25 वर्षात 27 लाख रुपये मिळतील. या शिवाय पॉलिसी घेतल्यानंतर मृत्यू झाल्यास कुटुंबाला या पॉलिसीचा प्रीमियम भरावा लागणार नाही आणि दरवर्षी त्यांना 1 लाख रुपये दिले जातील. याशिवाय 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी नॉमिनीधारकाला 27 लाख रुपये मिळतील.

या वयात घेता येणार पॉलिसी
ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वय 30 वर्षे आणि मुलीचे वय 1 वर्ष असावे. यामध्ये प्रीमियम केवळ 22 वर्षांसाठी भरावा लागेल. परंतु ही पॉलिसी तुमच्या आणि मुलीच्या वेगवेगळ्या वयोगटांनुसार देखील उपलब्ध आहे. यामुळे मुलीच्या वयानुसार या पॉलिसीमध्ये मुदत कमी होईल.

कशी आहे पॉलिसी
25 वर्षांसाठी पॉलिसी घेतली जाऊ शकते. 22 वर्षांपर्यंत प्रीमियम दिला जाऊ शकतो. रोज 121 रुपये किंवा महिन्याला 3600 रुपए मधेच जर विमाधारकाला मृत्यू झाला तर कुटुंबियांना भरावा लागणार नाही प्रीमियम मुलीला पॉलिसीच्या शिल्लक कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी मिळेल एक लाख रुपये.
पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला मिळेल 27 लाख रुपए कमी किंवा अधिक रकमेसाठी देखील ही पॉलिसी घेतली जाऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like