दुबईला आवडली महाराष्ट्राची ही स्पेशल केळी! मागच्या वर्षी भारताने केली 600 कोटींची निर्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात (India) जगातील 25% केळ्याचे पिक घेतले जाते. मागच्या वर्षी देशाने 600 कोटीपेक्षा जास्त केळी (Banana) निर्यात केली. परंतु, महाराष्ट्राच्या (Maharashtra) एका स्पेशल केळ्याचे चाहते दुबईमध्ये (Dubai) सुद्धा आहेत आणि नुकताच मोठ्या प्रमाणात माल तिथे पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे ‘जळगाव केळे’
उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले की, महाराष्ट्राची स्पेशल ‘जळगाव केळी’चा माल नुकताच दुबईत रवाना करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्याच्या या केळ्याला GI Tag मिळाला आहे. या स्पेशल केळ्याचा 22 मेट्रिक टन माल दुबईला पाठवण्यात आला आहे.

दुबईला पोहचले तळवंडीच्या शेतकर्‍यांचे केळे
मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ही 22 मेट्रिक टन केळी (Banana) जळगाच्या तळवंडी गावातील शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आली आहेत. देशाच्या कृषी निर्यात धोरणांतर्गत जळगावची ओळख केळे क्लस्टर म्हणून करण्यात आली आहे.

यासाठी स्पेशल आहे केळे

महाराष्ट्रातील ‘जळगाव केळे’ इतर केळ्यांच्या तुलनेत जास्त फायबर आणि मिनरलयुक्त असते.
त्याच्या याच वैशिष्ट्यामुळे यास 2016 मध्ये जीआय टॅग दिला गेला.
हा जीआय टॅग जळगावच्या निसर्गराज कृषी विज्ञान केंद्रासोबत रजिस्टर्ड आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

देशाने विकली 600 कोटीपेक्षा जास्त केळी
मागील काही वर्षात जागतिक स्तरावर कृषी प्रक्रिया अवलंबण्यासाठी भारताची केळी निर्यात वेगाने वाढली आहे.
ही वाढ प्रमाण आणि मूल्य दोन्ही संदर्भात दिसून आली आहे.
2018-19 मध्ये देशाची एकुण केळी निर्यात 1.34 लाख टन होतील आणि त्याचे मूल्य 413 कोटी रुपये होते.
2019-20 मध्ये ते वाढून 1.95 लाख टन झाले आणि त्याचे मूल्य 660 कोटी रूपये होते.

मागच्यावर्षी 2020-21 मध्ये कोरोना (corona) महामारी आणि त्यामुळे लागू प्रतिबंध असूनही देशाची केळी निर्यात एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान 1.91 लाख टन होती आणि तिचे मूल्य 619 कोटी रुपये आहे.

 

जगातील 25% केळी उत्पादन भारतात

भारत जगातील प्रमुख केळी उत्पादक देशांपैकी एक आहे.
येथे जगाच्या 25% केळी पिकवली जातात.
आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडु, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यात देशातील एकुण केळी उत्पादन जवळपास 70% आहे.

जीआय टॅग म्हणजे काय
जीआय टॅगचा संबंध Geographical Indication शी आहे.
हा टॅग प्रदेशातील विशेष उत्पादनाला दिला जातो, जो त्याची विशेष भौगोलिक ओळख दर्शवतो.
जसे की जळगाव केळे, दार्जिलिंग चहा, चंदेरी साडी, सोलापुरची चादर, मैसूर सिल्क, भागलपुरी सिल्क आणि बीकानेरी भुजियाला जीआय टॅग मिळाला आहे आणि ही नावे या उत्पादनांची विशेष जाहीर करतात.

Wab Title :- gi certified jalgaon banana exported to dubai india exported almost two lakh tonne worth rupees 619 crore in 2020

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये