पवारांना ‘घर’चा रस्ता दाखवणे ही काळाची गरज : गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. पुण्यात खासदार गिरीश बापट यांनी काँग्रेसला चांगलीच धुळ चारली. तर मावळ मतदार संघातही युतीचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा पराभव केला.

भाजप शिवसेनेचा आवाज राज्यात दिसुन आला. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या मोरवाडी येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. खासदार गिरीश बापटांसह अनेक नेते मंडळी उपस्थित होती. त्यावेळी गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत राजकारणातील मोठे नाव घेत त्यांच्यावर उपहासात्मक टीका केली.

महाराष्ट्रात सापडणार नाहीत, इतके मान्यवर या शहरात आहेत. मला सगळं समजण्यासाठी साडेचार वर्षे लागली. तसंच राजकारणात तडजोड करावीच लागते. त्यामुळे अनेकदा नाराजी उद्भवते. मात्र, लांब पल्ला गाठायचा असल्यास हे करावे लागते, असं बापट यांनी यावेळी म्हटलं. तर लोकसभेत दणका देऊन पवारांना घरचा रस्ता दाखवणे ही काळाची गरज होती. ते करून पिंपरी-चिंचवडकरांनी इतिहास घडवला, असं म्हणत बापट यांनी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

गिरीश बापट यांच्यासह रावसाहेब दानवे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधत विधासभेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्ष देशभर वाढतो आहे. भाजपचे पूर्वी लोकसभेत दोनच खासदार होते, आता ३०३ झाले आहेत. लोकसभेत घवघवीत यश मिळाले. हाच उत्साह कायम ठेवून आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागा, असं दानवेंनी म्हटलं.

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जेवढे कष्ट घेतले, तितकीच मेहनत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा व्हावा यासाठी घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आरोग्य विषयक वृत्त –

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

चक्रीवादळ ‘वायू’चा अलर्ट, गुजरातसह महाराष्ट्रावर वादळाचा ‘परिणाम’ !

स्वादीष्ट ‘मोमोज’ खाल्ल्याने होऊ शकते शरीराची हानी