Girish Mahajan On Eknath Khadse | राष्ट्रवादीचे बचेकुचे लोकही आमच्याकडे येतायत, गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Girish Mahajan On Eknath Khadse | शिंदे गटाच्या शिवसेनेतील (Shivsena Shinde Group) आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत हालचाली सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतही (NCP) हालचाली घडत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करु नये. त्यांच्या राष्ट्रवादीचे बचे कुचे जे लोक आहेत ते देखील आमच्याकडे येत आहेत, असे म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. (Girish Mahajan On Eknath Khadse)

मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत बोलताना महाजन म्हणाले, जरांगे पाटील यांनी त्यांचा जो हेतू आहे त्यानुसार काम करावं. सरकारने आता शिंदे आयोग नेमला असून त्याचे दररोज कामकाज सुरु आहे. बैठका होत आहेत आणि जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना त्या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. लवकरच यावर सन्माननीय तोडगा निघेल, असे महाजन म्हणाले. (Girish Mahajan On Eknath Khadse)

इंडिया आघाडीबद्दल एकमत करा

आधी विरोधकांनी त्यांच्या इंडिया आघाडीबद्दल काय ते एकमत करावे. अजूनही इंडिया आघाडीचा नेता ठरलेला नाही. नेता ठरला की चारी बाजूने कशी घोडे पळतात तसे ते पळत सुटतील. काँग्रेसचे नेते असतील किंवा इतर नेते हे शरद पवारांवर आदानी यांच्या भेटीवरुन टीका करु लागले आहेत. त्यामुळे त्यांनी आधी काय ते ठरवावे. काही दिवसांनी भाजप महाशक्ती विश्वगुरु सुपर पॉवर होणार असल्याचा टोला महाजन यांनी लगावला.

संजय राऊतांचे डोकं तपासलं पाहिजे

संजय राऊतांचे डोके तपासले पाहिजे. कुठे संजय राऊत, कुठे मोदी आणि कुठे संसद भवन, जगातील सर्वात मोठी वास्तू म्हणजे संसद भवन आहे. परंतु संजय राऊत यांचे मूर्खपणाचे प्रश्न आहेत. त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. चंद्रावर गेले तरी चंद्रावर का गेले सूर्यावर का गेले नाहीत असे त्यांचे मूर्खपणाचे प्रश्न असतात. त्यांच्या जिभेला हाड नाही, आम्ही त्यांना फार गांभीर्याने घेत नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

परत येण्यासाठी हातपाय जोडू नका

एकनाथ खडसेंवर निशाणा साधताना महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करु नये. तुम्ही शरद पवारांना घट्ट पकडून रहा. इकडे परत येण्यासाठी पुन्हा विनवण्या तसेच हातपाय जोडू नका. अजित पवार यांच्याबरोबर येण्यासाठी तुम्ही काय करत आहात, याची कल्पना आम्हाला आणि अजित पवारांना आहे. आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करु नका, असा सल्ला महाजन यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’

INDIA Alliance-Nitish Kumar | इंडिया आघाडीकडून PM पदासाठी नितीश कुमारांच्या नावाची घोषणा?,
मोठ्या नेत्याचा दावा