‘बिहारहुन दिल्लीला जावे, निदान मोदी तरी बाहेर पडतील’, CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘निशाणा’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यावेळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी भाजप नेते शेतकऱ्यांना राज्य सरकार मदतनिधी जाहीर करत नसल्याचा आरोप केला आहे, असा सवाल विचारला असता, उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर बिहारला गेलाच आहात तर पुढे दिल्ली जावे, निदान पंतप्रधान मोदी हे तरी बाहेर पडतील’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, कुणीही राजकीय चिखलफेक करण्याची गरज नाही. सध्या महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे. पण, विरोधी पक्ष नेते हे बिहारला प्रचाराला जात आहे. देवेंद्र फडणवीस हे बिहारला प्रचाराला गेले, त्यांनी आता पुढे जाऊन दिल्लीला जावे, जर दिल्लीला गेले तर पंतप्रधान मोदी सुद्धा बाहेर पडतील, असा टोला लगावला आहे. त्याचबरोबर तुम्ही राज्याचे जबाबदार राजकारणी आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्याची वेळ आहे. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा जर स्वत:चे राज्य हे अडचणीत असेल तर राज्यासोबत एकत्र येऊन केंद्राकडून मदतीसाठी मागणी केली पाहिजे, असेही ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हटले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर देखिल भाष्य केले.

केंद्र सरकार हे काही परदेशातील सरकार नाही. पक्षपात न करता सर्व राज्यांना मदत करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारवर आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी माझ्याशी बोलले आहे. त्यामुळे काही मदत लागल्यास हक्काने मागणार आहे.त्यामुळे केंद्र सरकरकडून मदत मिळण्याची आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, सध्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून लवकरच मदत देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. मागील सरकारने केवळ घोषणाबाजी केली असून आम्ही मदत करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर सर्वांनी काळजी घेणे गरजचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.