home page top 1

पुण्यातील येवलेवाडीत गोदामाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येवलेवाडी येथील दांडेकर नगरमधील एका गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली असून त्यात गोदामातील तेल व खादय पदार्थामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर भडकली आहे. त्यात गोदामाच्या शेजारीच लावलेले ट्रक, मोटार, टेम्पोही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. आग मोठ्या प्रमाणावर भडकली असून एक तासानंतरही ती नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाला अद्याप यश आले नव्हते.

हडपसरजवळील येवलेवाडी येथील दांडेकरनगरमधील एका गोदामाला आज सकाळी अचानक आग लागली. अग्निशामक दलाला याची माहिती सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी समजली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या गोदामात तेल व खादय पदार्थ असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. त्यामुळे गोदामाशेजारी पार्क केलेला ट्रक पेटला असून त्याच्या शेजारची एका कारलाही आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या १२ गाड्या, ३ ट्रँकर आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून ती शेजारीला गोदामापर्यंत पसरू नये, यासाठी अग्निशामक दलाचे जवान, अधिकारी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like