home page top 1

धुळे : चोरट्याने 7 तोळ्याची मंगलपोत लांबवली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सोनसाखळी चोरट्यांचा जिल्ह्यात व शहरात धुमाकुळ सुरुच आहे. देवपुरात 7 तोळे सोन्याची मंगल पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धुम स्टाईलने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सुनंदाबाई शांताराम दुसाने (रा. श्रीकृष्ण काॅलनी, देवपुर) यांनी देवपुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, सुनंदाबाई हजारे कॉलनी जवळ अंगणात उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारत त्यांच्या गळ्यातील 7 तोळे सोन्याची मंगलपोत हिसकावून धुम ठोकली.  1 लाख 75 हजार रुपये किंमत असलेली मंगलपोत चोरून चोरटे पसार झाले. महिलेने आरडाओरड केली परंतू रस्त्यावर कोणी नसल्याने चोरट्यांचे फावले. नंतर महिलेने पश्चिम देवपुर पोलीस स्टेशन गाठत अज्ञात दुचाकी स्वार चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस चौकातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

Loading...
You might also like