सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. सोमवारी दिल्लीत सराफ बाजारात सोन्याचे भाव 161 रुपयांनी घसरले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाली आहे. चांदी देखील आज 425 रुपयांनी स्वस्त झाली. तज्ञांच्या मते मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

सोन्याचे दर –
सोमवारी दिल्लीत सराफ बाजारात सोने 38,718 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,456 डॉलर प्रति औंस आणि चांदी 16.84 डॉलर प्रति औंस झाले.

चांदीचे दर –
चांदीच्या दरात देखील आज घसरण झाल्याने चांदी 46,155 रुपयांनी घसरुण 45,730 रुपये झाली. औद्योगिक क्षेत्रात आणि शिक्के बाजारात मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावात घसरण झाली.

घसरणीचे कारण –
HDFC सिक्युरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की, डॉलरमध्ये मजबूती आणि चीनमध्ये सकारात्मक मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय डेटा आल्यानंतर जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत घसरणं आली आहे.

सरकारने बदलले सोन्याच्या दागिणे खरेदीचे नियम –
आता भारतात सोन्याच्या दागिण्याच्या खरेदीसाठी BIS हॉल मार्किंग अनिवार्य (BIS Hallmarking for Gold Jewelry) करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 15 जानेवारी 2020 ला सूचना जारी केली आहे. ही अधिसूचना जारी केल्यानंतर 15 जानेवारी 2021 ला सोन्याच्या दागिण्यांवर BIS हाॅल मार्किंग अनिवार्य असेल. जर सराफ या नियमांकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला 1 लाख रुपयांचा दंड आणि 1 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल. याशिवाय दंड म्हणून सोन्याच्या रक्कमेच्या पाच पट अधिक रक्कम देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com