सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ तर चांदीही चमकली, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी सोन्या-चांदीच्या स्थानिक स्पॉटच्या किमतींमध्ये वाढ नोंदविली गेली. राष्ट्रीय राजधानीत शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 239 रुपयांची वाढ झाली. या वाढीसह दिल्लीतील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 49,058 रुपये झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार जागतिक किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे देशांतर्गत स्पॉट किमती वाढल्या आहेत. दरम्यान, मागील सत्रात गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,819 रुपयांवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 239 रुपयांच्या वाढीसह ट्रेंड करत होती.

स्थानिक सराफा बाजारात शुक्रवारी सोन्यासह चांदीचे स्पॉट भावही वाढले आहेत. शुक्रवारी चांदीचा दर 845 रुपयांनी वाढला. या वाढीमुळे चांदीचा दर प्रतिकिलो 49,300 रुपये झाला. दरम्यान मागील सत्रात चांदीची किंमत 48,455 रुपये प्रतिकिलो होती. जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाल्यास शुक्रवारी संध्याकाळी सोन्याच्या वायदा किंमतीत वाढ आणि स्पॉटच्या किंमतीत घट दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी संध्याकाळी कॉमेक्सवर सोन्याचा जागतिक वायदा दर 0.01 टक्के 0.20 डॉलरच्या वाढीसह 1,770.80 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.

याव्यतिरिक्त सोन्याची जागतिक किंमत यावेळी 0.25 टक्के म्हणजेच 4.43 डॉलरच्या घसरणीसह 1,759.36 डॉलर प्रति औंस पर ट्रेंड करत होती. त्याचबरोबर शुक्रवारी संध्याकाळी चांदीच्या वायदा भावात वाढ आणि जागतिक भावात घसरण दिसून आली. कॉमेक्सवर चांदीचा जागतिक वायदा भाव शुक्रवारी संध्याकाळी 0.22 टक्के म्हणजेच 0.04 डॉलरच्या वाढीसह 18.09 डॉलर प्रति औंसवर आणि चांदीची स्पॉट किंमत 0.20 टक्के म्हणजेच 0.04 डॉलरच्या घसरणीसह 17.77 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती.