पुणेकरांसाठी चांगली बातमी ! ‘कोरोना’मुक्त होण्याचे प्रमाण वाढलं, टक्केवारी गेली 60 टक्क्यांच्या जवळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात पुणे, मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले असतानाच पुण्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांचे बरं होण्याचे प्रमाण वाढलं असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणा 59.76 टक्क्यांवर पोहचले आहे. पुणे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 16 हजार 385 वर गेली आहे. तर 9791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 608 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी 355 जणांची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी 15 हजारांच्या आसपास गेला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 933 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 312 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 4 लाख 40 हजार 215 झाला आहे. देशात सध्या 1 लाख 78 हजार 014 सक्रीय रुग्ण आहेत. तर 2 लाख 48 हजार 190 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 14 हजार 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात 61 हजारापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यानंतर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो. मुंबईत देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मुंबईतून 70 कोरोना बाधित रुग्ण बेपत्ता झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.