रेल्वे कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! तब्बल अडीच महिन्यांचा पगार बोनस म्हणून मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. करोना काळात रेल्वेला मोठा फटका बसला असला तरी रेल्वेकडून आपल्या 11.58 लाख नॉन -गॅझेटेड कर्मचाऱ्यांना ( Employees Bonus) बोनस जाहीर केला आहे. या कर्मचाऱ्यांना 2019-20 साठी जवळपास अडीच महिन्यांचा (salary-of-78-days) पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून (central government) रेल्वेच्या या प्रस्तावाला मंजुरीदेखील मिळाली आहे. करोना काळात संकटाचा सामना करत प्रवाशांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बोनसमुळे प्रोत्साहन मिळू शकेल, अशी आशा प्रशासनानं व्यक्त केली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या बोनसमुळे रेल्वे प्रशासनावर 2081.68 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडण्याचा अंदाज आहे.

बोनससाठी पात्र असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांना दरवर्षी दूर्गा पूजा, दसऱ्यापूर्वीच बोनस मिळतो. यंदाही मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी दसऱ्यापूर्वीच होईल, असं आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकत्याच झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या सर्व पात्र नसलेल्या नॉन गॅझेटेड कर्मचार्‍यांना (आरपीएफ, आरपीएसएफ कर्मचार्‍यांना सोडून) 2019-20 साठी उत्पादनाच्या आधारावर 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता आधारित एकूण बोनस अंदाजे 2181.68 कोटी रुपये आहे. बोनससाठी पात्र नॉन गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन मूल्यांकन मर्यादा 7000 प्रती महिना निश्चित केली आहे. रेल्वे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना यामुळे जास्तीत जास्त 17,951 रुपयांचा बोनस मिळणार आहे.