Gopichand Padalkar | राष्ट्रवादीचा बेसच गुंडांचा, तो पक्ष गुंडांनाच सांभाळतो; इस्लामपूर मधील घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादीवर मोठा आरोप

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) सतत आरोप करत असतात. आता त्यांनी राष्ट्रवादी काँगेसला (NCP) गुंडांचा पक्ष म्हटले आहे. इस्लामपूर येथे कव्वालीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार (Firing) केला. त्याविषयी प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) बोलत होते.

 

इस्लामपूरमध्ये (Islampur) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने गोळीबार केल्याचे समोर आल्यानंतर पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचा बेसच गुंडांचा आहे.
तो पक्ष गुंड लोकांनाच सांभाळतो, असे पडळकर म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापर्यंत हा विषय पोहोचणार असून, मी त्यांच्याकडे कारवाईसाठी सूचना करणार आहे, असे देखील पडळकर म्हणाले आहेत.

 

या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे. इस्लामपूर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक (Arrest) केली आहे.
पीर अली पुणेकर (Pirali Punekar) असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. हत्यार परवाना शर्तीचे व शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन आणि
दहशत माजविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यांनी हवेत गोळीबार केला होता.

इस्लामपूरात मोमीन मोहल्ला परिसरात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर कव्वाली सुरु असताना हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.
यावर पोलिसांनी शोध घेत पुणेकरला अटक केली आहे.

 

Web Title :- Gopichand Padalkar | ncp is full of hooliganism party only cares for hooligans sharp attack of gopichand padalkar on ncp islampur firing

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | तुम्ही म्हणत होता ना सरकार पाडून दाखवा, आम्ही पाडले; आता बडबड बंद करा, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारने आता आपले खरे रंग दाखवायला रुवात केली, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप