Gopichand Padalkar | कारवर दगडफेक, रोहित पवारांचा फोटो ट्विट करत पडळकर यांनी साधला निशाणा, म्हणाले…

सांगली (Sangali) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar)यांच्या कारवर बुधवारी (दि.30 जून) सोलापूर (Solapur) येथे दगडफेक (Stone Outrage) करण्यात आली होती. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे राज्यभरात घोंगडी बैठका घेत आहे. काल सोलापूरमध्ये (Solapur) घोंगडी बैठका घेण्यासाठी ते गेले होते.

Gopichand Padalkar | targets ncp mla rohit pawar after attack on car

त्यावेळी त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या घटनेनंतर भाजपकडून (BJP) तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल रात्री ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) इशारा दिला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यानंतर आता स्वत: गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Gopichand Padalkar Targets NCP MLA Rohit Pawar After Attack on Car)

Preeti Sood | ‘आश्रम’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली – ‘दिग्दर्शक मांडी आणि क्लिवेज दाखवन्याची मागणी करायचा’

प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला

हल्ल्यानंतर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला (Establishment attacks on Dalit-Bahujan), असं या दगडफेकीचं वर्णन पडळकर यांनी केलं आहे.

Gold Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात घसरण ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold, जाणून घ्या आजचे दर

Gopichand Padalkar | targets ncp mla rohit pawar after attack on car

अशा भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता, ना आज दबला आहे, ना उद्याही दबेल… घोंगडी बैठका सुरूच राहणार… असं पडळकर यांनी म्हटले आहे. या ट्विट सोबत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार (NCP MLA Rohit Pawar) व त्यांच्या एका कार्यकर्त्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा थेट रोख रोहीत पवार (Rohit Pawar) यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

Election of Assembly Speaker । विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आघाडीत मतभिन्नता; ‘वर्षा’वर मंत्र्यांची बैठक

शरद पवारांवर केली होती टीका

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सोलापूर (Solapur) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार (Sharad Pawar) हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत.

Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत नितीन राऊत तर प्रणिती शिदेंना मंत्रिपद?

त्यांचे तीन खासदार (MP) आहेत, त्यांना मोठं कोण मानणार. तुम्ही मानणार असाल तर मला त्याचं
देणंघेणं नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार
(Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेस (Congress)
या पक्षांचा डीएनए (DNA) बहुजन विरोधी असल्याचंही ते म्हणाले होते. पडळकर यांनी केलेल्या या
टीकेमुळेच त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली असावी, अशी चर्चा आहे.

Pune Municipal Corporation News | नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील कागदपत्रे ताब्यात घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gopichand Padalkar | targets ncp mla rohit pawar after attack on car

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update