शाळेच्या WhatsApp ग्रुपवर महिला शिक्षकानं लिहीलं – ‘पाकिस्तान आमची प्रिय मातृभूमी’,सर्वत्र प्रचंड खळबळ

गोरखपूर : – शहरातील जीएन पब्लिक स्कूलच्या वर्ग चार, सेक्शन (अ ) मधील वर्ग शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ‘नाउन’ (संज्ञा) समजावण्यासाठी दिलेल्या उदाहरणांवरुन वाद निर्माण झाला आहे. यात शिक्षकांनी पाकिस्तानबद्दल बरीच उदाहरणे दिली आहेत, ज्यावर पालकांनी आक्षेप घेतला आहे. परंतु, हे प्रकरण पकडल्याचे पाहून शिक्षकांनी त्वरित हे उदाहरण हटवले आहे.

या संज्ञेचे स्पष्टीकरण देण्यासाठी शिक्षक शादाब खानम यांनी अशी काही उदाहरणे दिली की, ‘पाकिस्तान आमची प्रिय मातृभूमी आहे’. ‘मी पाकिस्तानी सैन्यात सामिल होईल’ आणि ‘राशिद मिन्हाद एक शूर सैनिक होता.’ काही पालकांनी त्यावर हा मेसेज पाहताच स्क्रीन शॉट घेऊन तो त्वरित व्हायरल केला. याबद्दल लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शिक्षिका शादाब खानम म्हणाल्या की, मुलांना संज्ञा सोप्या पद्धतीने समजावून सांगणे हा माझा उद्देश होता. यासाठी, मी गुगल सर्च करुन सर्वात लहान उदाहरण शोधले. ते पाकिस्तान, चीन किंवा अमेरिका आहे हे मी पाहिले नाही. जेव्हा मला हे समजले की यामुळे लोकांना राग येत आहे, तेव्हा मी लगेच हे काढून टाकले.

जी.एन. पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक, गोरक्ष प्रताप सिंह म्हणाले की, ही बाब माझ्या लक्षात येताच मी शिक्षकांना त्याबद्दल विचारले. त्यांनी चूक केल्याचे कबूल केले. मी त्यांना नोटीसही दिली आहे. स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

ऑनलाइन शिकवण्याच्या कामादरम्यान शादाब खानम यांनी पाकिस्तानविषयी दिलेल्या आक्षेपार्ह उदाहरणाचा शाळेच्या व्यवस्थापनाने तीव्र निषेध केला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने शिक्षकांना अध्यापनास रोखण्याव्यतिरिक्त या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली. शाळा व्यवस्थापनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकाचा हा गुन्हा अक्षम्य आहे. एनसीईआरटीने प्रमाणित पुस्तकांचे निरीक्षण करून शाळेच्या वतीने अध्यापनाच्या कार्यास परवानगी आहे. आम्हाला आपल्या राष्ट्रीयत्वाचा सर्व स्तरांवर आदर करावा लागेल. जो कोणी याच्या विरोधात वागेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

जिल्हा शाळा निरीक्षक ज्ञानेंद्र प्रतापसिंह भदोरिया म्हणाले की, प्रकरण गंभीर आहे. शाळा व्यवस्थापनाला चौकशी करून कारवाईबाबत जागरूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.