‘मला केमिस्ट्रीत 24 मार्क होते मात्र…’, IAS अधिकार्‍यानं शेअर केला स्वतःचा 12 वी चा निकाल

पोलिसनामा ऑनलाईन – बोर्डाचा निकाल म्हटल्यावर विद्यार्थ्यांना गुणांचे आणि भविष्याची चिंता जास्तच अधिक असते. दहावी आणि बारावीला मिळाले मार्क तुमचे भविष्य ठरवू शकतात असे मुलांना सांगितले जाते. मात्र या निकालांपेक्षा तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्यास काहीही अशक्य नाही असं सांगत या निकालांमुळे तण तणाव घेण्याची काही गरज नसल्याची पोस्ट अहमदाबादमधील एका आयएएस अधिकार्‍याने केली आहे. या पोस्टमध्ये अधिकार्‍याने स्वत:च्या 12 वीचा निकाल पोस्ट केला असून त्यामध्ये त्याला केवळ 24 मार्क असल्याचे दिसत आहे. सध्या ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

मुलांनी दहावी आणि बारावीच्या निकालाची जास्त चिंता करण्याची गरज नाही हे सांगण्यासाठी आयएएस अधिकारी असणार्‍या नितीन सांगवान यांनी स्वत:च्या निकालाची प्रत ट्विटरवर पोस्ट केली आहे. 2002 सालातील परीक्षेचा हा निकाल असून यामध्ये नितीन हे केमिस्ट्री म्हणजेच रसायन शास्त्रामध्ये अगदी काठावर उत्तीर्ण झाले आहे. हा निकाल पोस्ट करताना तुमच्या गुणांवर फार काही अवलंबून नसते, कारण आयुष्यात या बोर्डाच्या निकालापेक्षाही महत्वाच्या गोष्टी आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.मला बारावीला केमिस्ट्रीमध्ये 24 गुण मिळाले होते. उत्तीर्ण होण्यासाठी लागणार्‍या गुणांपेक्षा अवघा एक गुण अधिक. मात्र त्यामुळे मी आयुष्यात काय करणार आहे यावर परिणाम झाला आहे. गुणांच्या तणावखाली झुकू नका. आयुष्यात बोर्डाच्या निकांपेक्षाही बरेच काही आहे. हे निकाल म्हणजे स्वत:मध्ये डोकावून पाहण्याची संधी असल्याचे समजा. स्वत:ला दोष देत बसू नका, असे नितीन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.