कारखान्यांमध्ये आता 12 तासाची होऊ शकते शिफ्ट, कायद्यात बदल करण्याची तयारी – रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार कारखान्यात काम करण्याची शिफ्ट बदलू शकते. एका अहवालानुसार ८ तासांची शिफ्ट १२ तासांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. सरकार १९४८ च्या कायद्यात बदल करण्याचा विचार करत आहे. खरंतर लॉकडाऊनमुळे सध्या मजुरांची कमतरता भासत असून दैनंदिन मालाची मागणी वेगाने वाढली आहे. यामुळेच सरकार त्यात बदल करण्याचा विचार करत आहे.

१२ तासाची होऊ शकते शिफ्ट –
कायद्यात नवीन बदल झालेल्या कंपन्यांना शिफ्ट वाढवण्याचा अधिकार मिळेल. सध्या दररोज ८ तासांची शिफ्ट आहे. आठवड्यात सहा दिवसच काम करवून घेतले जाऊ शकते. जर या प्रस्तावावर निर्णय झाला तर दररोजची शिफ्ट १२ तासांची होईल. आठवड्यात सहा दिवसांपर्यंत परवानगी असेल.

दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत या प्रस्तावावर विचार होत असल्याचे सांगितले. यासाठी १९४८ च्या कारखाना अ‍ॅक्टमध्ये सुधारणा करावी लागेल. चालू कायदा १९४८ च्या कलम ५१ मध्ये असे म्हटले आहे की, कोणत्याही प्रौढ व्यक्तीस कारखान्यात काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. तसेच कोणत्याही आठवड्यात ४८ तासांपेक्षा जास्त काम करवून घेतले जाऊ शकत नाही.

तथापि, त्याच कायद्यात जादा ओव्हरटाइमची तरतूद आहे, ज्याचा वापर ७२ वर्षांपासून इंडियन इंडस्ट्री करत आहे. पण सरकारचे म्हणणे आहे की, अशा काही तरतुदी अपवादात्मक परिस्थितीत केल्या पाहिजेत.

असे का होत आहे? – वरिष्ठ अधिकऱ्यांच्या एका ग्रुप बैठकीत म्हटले गेले की, लॉकडाऊनच्या सद्य परिस्थितीत औषधे आणि दैनंदिन वस्तूंसाठी शिफ्ट वाढवावीच लागेल.