मोदी सरकारकडून शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट ! कमाई वाढवण्यासोबतच मिळणार ‘हे’ लाभ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या विविध सुविधानंतर आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठी भेट देणार आहे. पुढील पाच वर्षात नवीन 10 हजार कृषी उत्पादक संघटना उभ्या करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी 6,600 कोटी रुपयांचे अनुदान देखील उभे करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. FPO हा छोट्या शेतकऱ्यांचा एक समूह असून याद्वारे बाजारातील शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात देखील या गोष्टींचा उल्लेख केला होता.

मंत्रिमंडळाची परवानगी बाकी
कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला निधी संपूर्णपणे केंद्र सरकार देणार आहे. यासाठी कृषि मंत्रालयाची परवानगी मिळाली असून आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या परवानगीची आम्हाला प्रतीक्षा असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

कृषी मंत्रालय देणार शेतकऱ्यांना अनेक सुविधा
या योजनेसाठी कृषी मंत्रालय निधी देणार आहे. तसेच मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देखील यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कर्ज देखील स्वस्तात उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान देखील कमीतकमी किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

असे काम करणार FPO
मिळालेल्या माहितीनुसार, FPO ला एक बिझनेस युनिट चालवणार आहे. या युनिटमधून जी कमाई होईल ती शेतकऱ्यांमध्ये वाटण्यात येईल. इतर कंपन्यांसारखेच या युनिटकडे देखील आपली क्षमता आणि बिझनेस वाढवण्याचा प्लॅन आहे. छोट्या कृषी कंपन्या तसेच नाबार्डबरोबर मिळून हे बिझनेस युनिट काम करणार आहे.

Visit : Policenama.com