सरकार ‘पेट्रोल-डिझेल’च्या उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रूपयांची वाढ करू शकतं, इंधन महागणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या काळात पेट्रोलचे दर भडकू शकतात. कारण सरकारने सोमवारी कायद्यात संशोधन केले ज्यामुळे भविष्यात पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कात 8 रुपये प्रति लीटरची वाढ केली जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थ विधेयक 2020 मध्ये की मर्यादित बदल केला होता ज्यात सरकार पेट्रोल आणि डिझेलवर विशेष उत्पादन शुल्क वाढवून क्रमश: 18 रुपये आणि 12 रुपये लीटर करु शकतात. लोकसभेत कोणत्याही चर्चेशिवाय अर्थ विधेयक संशोधनासह पारित करण्यात आले.

सरकारने 14 मार्चला पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कावर 3 रुपये प्रति लीटरची वाढ केली होती, ज्यामुळे महसूल म्हणून वर्षाला 39,000 कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ होण्याची अपेक्षा होती. या शुल्क वाढीत अतिरिक्त उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ आणि रस्ते आणि बांधकामाच्या उपकरातील 1 रुपयांच्या वाढीचा समावेश असेल.

एका अधिकाऱ्याने सांगिलते की ही एक सक्षम तरतूद आहे आणि उत्पादन शुल्कात कोणताही बदल केला गेला नाही. संशोधन सरकारला कोणत्याही क्षणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये 8 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढ करण्याची शक्ती देते.