‘त्यानं’ आजीचा खून करून गुपचूपमध्ये उरकला अंत्यविधी, पोलिसांकडून नातवासह चौघांना अटक

पोलिसनामा ऑनलाईन टीम –  सततच्या होणार्‍या वादातून नातवाने चौघांच्या मदतीने आजीचा खून करीत गुपचूपरित्या अंत्यविधी उरकल्याची घटना घडली आहे. यापृकरणाी महाड तालुका पोलिसांनी नातवाला आणि अन्य तिघांना अटक केली. चौघांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील आंबीवली येथील द्रौपदी पांडूरंग पवार (वय 74) यांचे 4 मार्चला रात्री निधन झाले होते. त्यांच्यावर 5 मार्चला अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु पोलीसांना हा घातपात असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी याप्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरु केला.

द्रोपदी पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. यापृकरणी पोलिसांनी नातू रुपेश जनार्दन पवार( वय 33)याच्यासह तिघांना अटक केली आहे.

किरकोळ कारणावरुन 4 मार्चला द्रोपदी पवार आणि रुपेश यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या रुपेशने अंगणात असलेल्या फरशीने आजीच्या डोक्यात वार करुन तिला ठार मारले. त्यानंतर त्यांनी द्रोपदी यांचा अंत्यविधी गुपचूप उरकून घेतला. मात्र काही दिवसानंतर गावात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. पोलिसांनाही या प्रकरणाचा संशय आला. त्यामुळे त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करून चौघांवरही गुन्हा दाखल केला. महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक एन.एम.गवारे व उपनिरिक्षक महेश कुचेकर हे या प्रकरणाचा तपास करत होते.