गटशिक्षणाधिकाऱ्यांची कदमवस्ती शाळेला अचानक ‘भेट’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती शाळेला पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य रमेश जाधव व पुरंदर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे यांनी नुकतीच भेट दिली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार व सर्वच उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबवत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्वच विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर पाहून भारावून गेले व स्वतः विद्यार्थ्यांकडून सुलेखनवही व पेन हाती घेवून विद्यार्थ्यांप्रमाणे सुंदर अक्षरे काढण्याचा मोह आवरता आला नाही.

येथील आदर्श मुख्याध्यापक अनंता जाधव व उपशिक्षिका सुरेखा जाधव यांच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक दर्जा उत्कृष्ट आहे. येथील दोन विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये प्रवेश मिळालेला आहे. यामुळे येथील पटसंख्या १५ वरुन ४८ पर्यंत वाढ झाली. सासवड, जेजुरी, परिंचे या भागातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.

आणखी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून पालक आग्रह करत आहेत,मात्र वर्गखोल्या फक्त दोनच आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत. व मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या मर्यादीतच ठेवावी लागते.या समस्या व नविन सुसज्ज इमारत व इतर भौतिक सोयी-सुविधांसाठी येथील ग्रामस्थांनी शाळेला जागा ११ गुंठे जागा मोफत दिलेली आहे. या जागेत लवकरात लवकर सुसज्ज वर्गखोल्या आम्हाला मिळाव्या.ही मागणी येथील विद्यार्थ्यांनी स्वत: कथन केल्या. यावर जाधव यांनी प्रयत्न करणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.