‘परका तो परकाच’, पालकमंत्री शिंदे यांच्याकडून रोहित पवारांना ‘टोला’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शेवटी आपल्यातला तो आपलाच अन् परका तो परकाच. एवढं मात्र खरं. कारखानदारी-उद्योग, शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा स्वार्थी विचार कधी मनाला शिवला देखील नाही. नेहमी सर्वसामान्य माणूस म्हणून जी माझी गरज आहेत. तीच सर्वसामान्य लोकांना मिळाली पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या रोहित पवार यांना टोला लगाविला.

आज चांदे खुर्द (ता.कर्जत) येथे वालवड, चांदे खुर्द ते गुरवपिंप्री रस्ता डांबरीकरण, गावाअंतर्गत रस्त्या काँक्रीटीकरण काम, मारुती मंदिरा समोरील सुशोभीकरणाचे काम, भोसलेवस्ती येथे सभामंडप बांधकाम अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले की, कर्जत तालुक्यातील २१ गावांसाठी संजीवनी देणार्‍या तुकाई चारी योजनेसाठी १०० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले. या चारीमुळे अनेक पिढ्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने अनेक वर्षांचा प्रश्न सोडविता आला.

विविध विकासकामांसाठी भरभरून निधी विविध योजना आणि खात्यांमधून आणण्याचे काम सातत्याने केले आहे. यापुढेही अजून निधी देण्याची तरतूद करेल. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास केला जाईल. ज्या परिस्थितीत मी माझं आयुष्य जगलो आहे, ते आयुष्य माझ्या मतदाराच्या वाटेला येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या मतदारांना अभिमान वाटेल, असे कार्य जलसंधारण खात्याच्या माध्यमातून केले आहे, असेही शिंदे म्हणाले.

यावेळी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, बळीराम यादव, पवार गुरुजी, संपत बावडकर, अमृत लिंगडे, सरपंच प्रल्हाद सुर्यवंशी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –