तलावात मर्सिडीज कार पडल्याने दोघांचा मृत्यू, एक मृतदेह सापडला (व्हिडीओ)

गांधीनगर : गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गांधीनगरच्या अंबापुरजवळ एक मर्सिडीज कार रस्त्याच्या कडेला असणार्‍या तलावात जाऊन पडली. या अपघातात कारमधील दोन लोकांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या फायर ब्रिगेडच्या टीमने तलावातून कार आणि एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. तर कारमधील एका महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

या दुर्घटनेचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे, ज्यामध्ये एक पुरूष आणि एक महिला कारच्या सनरूफच्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तलावात खुप आतमध्ये गेलेल्या कारच्या छतावर चढून ते स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि मदतीसाठी ओरडत आहेत. तलावाच्या किनारी असलेले लोक काहीही करून त्यांना कार पकडून ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

 

A Mercedes car plunged into a lake near Ambapur village in Gandhinagar on Sunday afternoon, killing at least one of the two persons inside it. The body of the man was fished out. According to eyewitnesses, there was a woman too inside the car. She could not be found till now.#ahmedabad #vadodara #vadodara_lover

Geplaatst door Vadodara lover op Maandag 1 juni 2020

 

याच दरम्यान कारच्या टपावर असलेल्या महिला तोल जाऊन ती पडू लागते. पुरूष तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला यश येत नाही. ज्यानंतर दोघेही कारसोबत तलावाच्या खोल पाण्यात बुडतात. तलावाच्या किनार्‍यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला आहे. माहिती मिळाल्यानंतर फायर ब्रिगेडची टीम सुद्धा घटनास्थळी आली.

फायर ब्रिगेडच्या टीमने तलावात बुडालेली मर्सिडीज कार बाहेर काढली. तसेच कारमधील पुरूषाचा मृतदेह बाहेर काढला असून महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like