Gujarat Elections Result | “काही लोक संपादक आहेत की, पादक हे बघावं लागेल”; आशिष शेलार यांची संजय राऊतांवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातच्या निवडणुकांचा निकाल (Gujarat Elections Result) सुरू आहे आणि यावेळेसही गुजरात भाजपकडे जाणार आहे. गेली जवळ जवळ २७ वर्षे भाजप गुजरातमध्ये सत्तेवर आणि सरकारविरोधी लाटेचा वापर करून विरोधी पक्ष सत्तेत येण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. या निकालावर (Gujarat Elections Result) आता राजकीय स्थरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशीच एक प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती.

 

संजय राऊत म्हणाले होते, “गुजरातचा निकाल (Gujarat Elections Result) अपेक्षितच आहे. तिकडे आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती तर नक्कीच अटीतटीची लढाई झाली असती. पण, बहुधा दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा, असं साटंलोटं आप आणि भाजपात झालं असावं, अशी लोकांना शंका आहे,” असे बोलून त्यांनी भाजप आणि आम आदमी पक्षावर छुपी युती करण्याचा आरोप केला. आता या आरोपावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार यांनी सुरुवातीला विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले, “गुजरातमध्ये सातव्यांदा बहुमत घेऊन भाजप सरकार स्थापन होईल, असं दिसत आहे.
हा विक्रम आहे. जेव्हा विक्रम होतो, तेव्हा काही लोकांच्या पोटात मुरडा येतोच आणि त्याचा आवाज आपण बघत आहोत.”
पुढे त्यांनी त्यांचे लक्ष संजय राऊत यांच्याकडे वळवले आणि म्हणाले,”काही लोक संपादक आहे
की, पादक हे बघावं लागेल. सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषणाचे काम म्हणजे संजय राऊत यांची पत्रकार परिषद.”

 

आशिष शेलार एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. गुजरातमध्ये भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल असे दिसत आहे.
गुजरात विधानसभेत एकूण १८८ जागा असून, त्यातील १५८ जागांवर भाजप पुढे आहे.
या निवडणुकीत आम आदमी पक्ष करिष्मा घडवेल अशी चर्चा सुरू असताना त्यांचा गुजरातचा कार्यक्रम दहा जागांच्या आत उरकताना दिसत आहे.
मात्र, आपने दिल्ली महानगरपालिकेत अनपेक्षित विजय मिळवल्याने भाजप आणि आपमध्ये छुपी युती सुरू असल्याची चर्चा होत आहे.

 

Web Title :- Gujarat Elections Result | bjp mla ashish shelar reply sanjay raut over aap and bjp gujarat election and mcd election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ‘तू माझ्या मित्राचा मर्डर केला, तुझी विकेटच पाडतो’ म्हणत तरुणावर हल्ला; हडपसर परिसरातील घटना

Driving Licence lost | ड्रायविंग लायसन्स हरवलंय? चिंता नको ‘हे’ करा

CM Eknath Shinde | गुजरात विधानसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या