गुजरात ! इंडियन ऑइल रिफायनरीच्या जवळ ‘स्फोट’, 3 ठार तर 2 ‘बेपत्ता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरात मधील एका केमिकल स्टोरेज टँकजवळील गोदामात स्फोट झाला आहे. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. कांडला बंदर आणि इंडियन ऑईलच्या कांडला रिफायनरी जवळ हा स्फोट झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

https://twitter.com/ANI/status/1211583776238661634

मात्र हा स्फोट नेमका कशाचा झाला हे अद्याप समजू शकले नसून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी धाव घेतली आहे. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. तर बेपत्ता लोकांचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/