PUBG च्या गेमिंग पार्टनरसोबत राहण्यासाठी ‘तिची’ चक्क पतीकडे घटस्फोटाची मागणी 

गुजरात : वृत्तसंस्था – भारतात पबजी खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून या गेमच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्याही वाढली आहे. पबजीच्या वेडापायी गुजरातमधील एका महिलेने चक्क वुमन हेल्पलाईनकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. तिला पतीशी घटस्फोट घेऊन गेमिंग पार्टनरसोबत रहायचे आहे. ही महिला १९ वर्षांची असून तिला एक लहान मुलगाही आहे. महिलेच्या या अजब मागणीमुळे समुपदेशकही चक्रावले आहेत.

गुजरातमध्ये महिलांसाठी ‘अभयम’ (क्रमांक १८१) ही हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर नुकताच एका महिलेने फोन करून पबजी पार्टनर नवरा हवा म्हणून घटस्फोटाची मागणी केली आहे. वुमन  हेल्पलाईनने दिलेल्या माहितीनुसार , विवाहित महिला गेल्या काही महिन्यांपासून पबजी हा गेम खेळत आहे.

तिला गेमचे व्यसन लागले आहे. हा गेम खेळताना महिलेची अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली. आता त्या महिलेला पतीला सोडून पबजी मधील गेमिंग पार्टनरसोबत लग्न करायचे आहे.विशेष म्हणजे  गेम खेळताना ओळख झालेल्या तरुणाला लग्न करायचे आहे की नाही, याबाबत महिलेला खात्री नाही. पतीकडे घटस्फोट मागणाऱ्या महिलेच्या वडिलांनी या गोष्टीला विरोध केला आहे.

हेल्पलाइनवरील समुपदेशक कर्मचाऱ्यांनी महिलेला निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पबजी गेमचे व्यसन सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला असून कोणताही निर्णय घाईत न घेण्याचे सुचवले आहे.  त्या महिलेने विचार करुन पुढील निर्णय कळवते, असे समुपदेशकांना सांगितले आहे.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like